भारतात अध्यक्षीय पध्दतीस विरोध होण्याची कारणे | Reasons for opposition to the presidency in India

भारतात अध्यक्षीय पध्दतीस विरोध होण्याची कारणे Reasons for opposition to the presidency in India

भारतात अध्यक्षीय पध्दतीस विरोध होण्याची कारणे Reasons for opposition to the presidency in India

१) भारतात हजारो वर्षापासून राजेशाही होती म्हणून अध्यक्षीय पद्धती या प्राचीन परंपरेशी सुसंगत आहे असे म्हणणे हे तर्क विसंगत आहे. ऋग्वेद काळात गणराज्ये अस्तित्वात होती. अनेक परकीय आक्रमणे होऊनसुध्दा खेड्यातील यंत्रणा लोकशाही प्रकारचीच होती. तसेच १७७३ पासून हळूहळू विकसित होत गेलेली प्रातिनिधिक राज्यव्यवस्था अनेकांच्या परिश्रमातून लोकांच्या अंगवळणी पडलेली आहे. गेली ५५ वर्षे विकसित झालेली आधुनिक संसदीय यंत्रणा मोडीत काढून भूतकालीन संस्थांचा जिर्णोध्दार करणे हे प्रतिगामीपणाचे आहे.

२) भारतीय प्रधानमंत्र्यांची स्थिती राष्ट्राध्यक्षासारखीच सुरक्षित आहे. हवे ते कायदे कायदे संसदेकडून करवून घेणे पंतप्रधानांना आजवर सहज शक्य झाले आहे. अविश्वास ठरावातून सत्ताभ्रष्ट होण्याची वेळ क्वचित प्रसंगी येत असली तरी नरसिंह रावसारखा पंतप्रधान काठावरचे बहुमत असूनही कालावधी पूर्ण करुन स्वतःस हवे ते निर्णय घेऊ शकतो.

३) मंत्री परिषदेतील सहकारी निवडतांना भारतीय प्रधानमंत्र्यांना गुणवंत व्यक्तीची वाण भासली आहे किंवा अमेरिकन राष्ट्रध्यक्षांनी केवळ गुणवंत व्यक्तीचीच मंत्रीपरिषदेवर निवड केली असा इतिहास आढळत नाही.

४) अध्यक्षीय मंत्रीपरिषदेतील सभासदही राजकीय संघर्ष वा धकाधकीपासून मुक्त असत नाहीत. तसे असते तर त्यांची सरकारे अधिक कार्यक्षम होऊन प्रगतीचा गाडा अधिक गतीमान झाला असता. पण असे दिसून न येता उलट अध्यक्षीय पद्धतीच्या राज्यव्यवस्था लष्करी हुकुमशाहीत परावर्तीत झालेल्या आहेत.

५) भारतासारख्या देशात व्यक्तीपूजेला पोषक मानसिकता असल्यामुळे एखादी लोकप्रिय व्यक्ती निवडून आल्यास व ती अति महत्त्वाकांक्षी प्रवृत्तीची असल्यास अध्यक्षीय लोकशाहीचे रूपांतर नियंत्रण करणारी यंत्रणा राजकीय परिपकृता भारतीय राजकीय व्यवस्थेत नाही.

६) फक्त संसदीय पद्धतीमुळे भ्रष्टाचार होतो असे नसून तो कोणत्याही प्रणालीत आढळतो.त्यामुळे अध्यक्षीय शासनपद्धती स्विकारल्यास त्याचे निराकरण होईल याची सुतराम शक्यता नाही.

७) भारतात द्विपक्ष/त्रिपक्ष पद्धतीचा स्विकार केल्यास राजकीय अस्थिरता घालविता येते.

अध्यक्षीय पध्दतीचा स्वीकार केल्यास शास्त्रनसंस्थेची कार्यक्षमता वाढेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही. शासनप्रमुखाच्या हाती किती सत्ता आहे, यावर शासनसंस्थेची कार्यक्षमता मुळीच अवलंबून नसते. मात्र अध्यक्षीय शासनपध्दतीमुळे हुकूमशाहीच्या धोक्यावर निश्चितच नियंत्रण ठेवता येते. कारण महत्त्वाकांक्षी व लोकप्रिय व्यक्ती देशाचे अध्यक्ष म्हणून निवडली गेली तर तिच्या एकाधिकारशाही प्रवृत्तीचे नियंत्रण करणारी आणि राजकीय परिपक्वता आपल्या राजकीय व्यवस्थेत अजूनही नाही. अशा परिस्थितीत एकाच व्यक्तीच्या हाती सत्तेचे संकटात आणू शकेल.

संसदीय पध्दती नेहमीच अस्थिरता निर्माण करते, असेही म्हणता येत नाही. सद्यस्थितीत भारतीय राजकारणात काहीशी अस्थिरता दिसत असली तरी आजची परिस्थिती ही भारतातील राजकीय विकासाची संक्रमणकालीन अवस्था आहे. देशातील राजकीय शक्तीची फेरजुळणी होत जाईल तसतशी ही अस्थिरताही कमी होत जाईल.

भारतातील राजकीय परिस्थितीचा विचार करता आपल्या देशासाठी कार्यकारी प्रमुखाकडे अमर्याद सत्ता देणारी व्यवस्था निश्चितच फायदेशीर ठरणार नाही, संसदेला उत्तरदायी असलेली कार्यकारी मंडळ हीच आपल्या दृष्टीने चांगली अवस्था होय. आपल्या घटनाकारानी विचारपूर्वक संसदीय शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. त्यांनी अध्यक्षीय पध्दतीचे धोके ओळखून देशाला संसदीय राज्यपध्दती दिली आहे. देशात द्विपक्ष/ त्रिपक्ष पध्द्ती निर्माण झाल्यास संसदीय पध्दती अधिक उपयुक्त ठरू शकेल.

 

भारतीय संसदीय पद्धतीतील त्रुटी | Errors in the Indian Parliamentary system

भारतात संसदीय पद्धती यशस्वी होण्यासाठी उपाय | Remedies for Success in Parliamentary System in India

संसदीय व अध्यक्षीय लोकशाही पध्दत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *