भारतात संसदीय पद्धती यशस्वी होण्यासाठी उपाय | Remedies for Success in Parliamentary System in India

भारतात संसदीय पद्धती यशस्वी होण्यासाठी उपाय | Remedies for Success in Parliamentary System in India

भारतात संसदीय पद्धती यशस्वी होण्यासाठी उपाय | Remedies for Success in Parliamentary System in India

भारतात संसदीय पद्धती यशस्वी होण्यासाठी उपाय | Remedies for Success in Parliamentary System in India

अध्यक्षीय लोकशाहीचे धोके लक्षात घेऊन जबाबदार संसदीय पद्धती भारतीय राज्यव्यवस्थेत घटनाकारांनी विचारपूर्वक निवडली आहे. या पद्धतीत असलेल्या उणीवा दूर करुन ती यशस्वी होण्यासाठी अधिक कार्यक्षम होण्यासाठी खालील उपाय/सूचना सुचविता येतील.

प्रत्यावहनाचा हक्क : 

लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार-पणास आळा घालण्यासाठी मतदार जनतेस प्रत्यावाहनाचा हक्क बहाल करावा.

स्थायी समित्यांची पद्धत : 

सभागृहातील सर्व विचारधारांचे प्रतिनिधीत्व करणारी स्थायी समिती प्रत्येक मंत्रालयात स्थापन करून तिला मंत्रालयाची रचना, कार्यपद्धती, ध्येयधोरणाची निश्चिती, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी, तपास करण्याचे अधिकार इ. हक्क द्यावेत.

विज्ञान व तंत्रज्ञान : 

योग्य दिशेने प्रगती घडवून आणण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषज्ञाची एक स्थायी समिती नेमून तिला संसदेला संबंधित क्षेत्रात सल्ला देण्याचा अधिकार असावा.

जन सहभाग :

भारतात जनतेच्या सहभागा अभावी नोकरशहा व राजकारणी यांच्या हाती आमाप सत्ता एकवटल्यामुळे ते बेजबाबदारपणे वागून सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. हे थांबविण्यासाठी लोक समित्या स्थापून त्या सक्रीय करणे, प्रशासनाचे विकेंद्रीकरण करावे. त्यामुळे लोकांचा राजकीय प्रक्रियेतील सहभाग वाढल्याने नोकरशहा व राजकारण्यावरील सत्तेचा दुरुपयोग करण्याबाबतचा प्रतिबंध मोठ्या प्रमाणावर वाढेल.

राजकीय पक्ष : 

निकोप तत्व-निष्ठ व कार्यकर्त्यावर आधारीत पक्ष उभारणी केली जावी.

निवडणुका : 

मुक्त व न्याय व्हाव्यात या दृष्टीने निवदणूक आचारसंहिता काटेकोरपणे अंमलात आणावी –

  1. संविधानाने दिलेली खर्चाची मर्यादा न ओलांडणे.
  2. मतदारांना मतदान करताना ओळखपत्र असल्याशिवाय मतदान करण्याचा अधिकार असू नये. 
  3. मंत्र्यांनी सरकारी वाहनांचा दुरुपयोग करू नये. मतदारांवर दडपण आणू नये.
  4. संसदीय राज्यपद्धतीस अधिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी द्विपातळी किंवा त्रिपातळी पक्ष पद्धती निर्माण करावी.

भारतीय संसदीय पद्धतीतील त्रुटी Errors in the Indian Parliamentary system

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *