भारताने अध्यक्षीय शासन पद्धती असावी याचे समर्थन Support that India should have a presidential system of governance

भारताने अध्यक्षीय शासन पद्धती असावी याचे समर्थन | Support that India should have a presidential system of governance

भारताने अध्यक्षीय शासन पद्धती असावी याचे समर्थन Support that India should have a presidential system of governance.

भारताने अध्यक्षीय शासन पद्धती असावी याचे समर्थन Support that India should have a presidential system of governance

१९५० पासून संसदीय शासनपद्धती सुरू झाल्यापासून ज्या उणीवा/दोष स्पष्ट झाले त्यावरून भारतासाठी अध्यक्षीय पद्धती जास्त उपयुक्त ठरेल असे काही राजकीय अभ्यासकाना वाटते. या समर्थकाकडून अध्यक्षीयपद्धती स्विकारावी यासाठी केला जाणारा युक्तीवाद पुढीलप्रमाणे-

१) अध्यक्षीय पद्धती भारताच्या प्राचीन राजेशाहीशी सुसंगत आहे.

२) अध्यक्षीय पद्धती मुळे कार्यकारी मंडळाला कार्यकालाची हमी मिळत असल्यामुळे निर्वेधपणे काम करता येईल. संसदीय पद्धतीत विधिमंडळाला मंत्रीमंडळाला पदच्युत करण्याचा अधिकार असल्यामुळे निर्वेधपणे काम करता येत नाही.

३) या पद्धतीत अध्यक्षास मंत्रीमंडळ परिषदेतील सहकारी म्हणून गुणवंत व्यक्तींची निवड करता येते. त्यावर कुठलेही बंधन नाही.

४) अध्यक्षीय पद्धतीत मंत्रीपरिषदेतील सदस्यांची निवड अध्यक्षा-तर्फे होत असल्यामुळे राजकीय संघर्ष व ओढाताणीपासून ते मुक्त असतात. परिणामी ते आपापल्या खात्याच्या प्रशासनाकडे अधिक निःपक्षपातीपणे लक्ष केंद्रित करू शकतात.

५) अध्यक्षीय लोकशाही पद्धतीत कार्यकारी मंडळाच्या कृतीची विधिमंडळाकडून अधिक कडक तपासणी होत असल्यामुळे कार्यकारी प्रमुखाच्या सत्तेला व महत्त्वाकांक्षेला लगाम घातला जातो.

६) भारतात राजकीय घराणेशाही, नातेवाईकवाद, वशिलेबाजी, भ्रष्टाचार, गटबाजी, लाचलुचपत, पक्षांतरे, दहशतवाद, गुंडगिरी- यामुळे राजकीय अस्थिरता वारंवार येते, म्हणून अध्यक्षीय लोकशाहीचा स्विकार केल्यावर सदर व्याधींचे निराकरण करता येईल.

७) भारतात अनेक पक्षपद्धती अस्तित्वात असल्यामुळे कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद बहमत न मिळाल्यास शासन संस्थेला कधीही स्थैर्य लाभू शकणार नाही. उदा. १९८९ व १९९९ पर्यंतच्या लोकसभा निवडणुका, उत्तर प्रदेशातील २००२ ची विधानसभा निवडणूक.

संसदीय व अध्यक्षीय लोकशाही पध्दत

भारतीय संसदीय पद्धतीतील त्रुटी | Errors in the Indian Parliamentary system

भारतात संसदीय पद्धती यशस्वी होण्यासाठी उपाय | Remedies for Success in Parliamentary System in India

1 thought on “भारताने अध्यक्षीय शासन पद्धती असावी याचे समर्थन | Support that India should have a presidential system of governance”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *